Military Bharti Training 2025-26: आर्मी ची तयारी करणाऱ्यांना 10,000 रुपये महिना! करा अर्ज

Military Bharti Training 2025-26

Military Bharti Training 2025

आर्मी भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी ही खूप आंदनची बातमी आहे. कारण Military Bharti Training 2025-26 द्वारे आता आशा उमेदवारांना दर महिन्याला 10,000 रुपये मिळणार आहेत. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2025 आहे. त्यामुळे होईल तेवढ्या लवकर अर्ज करा. आणि या सुवर्णसंधीचा लाभ घ्या.

भरती करणाऱ्या काही उमेदवारांच्या घरची परिस्थिति हालाखीची असते. तरी पण ते आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडत असतात अश्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ झाला पाहिजे हा आमचा उद्देश आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महाज्योती आर्मी भरती प्रशिक्षण योजना 2025-26

प्रशिक्षणाचा कालावधी : 06 महीने प्रशिक्षणाचा कालावधी असणार आहे.

प्रशिक्षणासाठी मिळणारी रक्कम : 10,000 प्रतिमहा. (75% उपस्थिती असलेल्या उमेदवारांना)

एक सोबत मिळणारी रक्कम : 12,000/- रुपये.

Mahajyoti Army Scholarship Program Eligibility

आवश्यक पात्रता : जर तुम्हाला पण या योजनेसाठी अप्लाय करायचे असेल तर तुमच्याकडे काही आवश्यक पात्रता असणे गरजेचे आहे.

  • अर्ज करणारा विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा/ असावी.
  • विद्यार्थी इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग यामधून असावा/ असावी. (OBC, VJ-A, NT-B, NT-C, NT-D, SB)
  • विद्यार्थी हा किमान 10वी पास असणे आवश्यक आहे.
  • विद्यार्थ्याचे वय 17 ते 19 वर्षे असणे आवश्यक आहे.

Physical Qualification for Army Bharti Training Program

आवश्यक शारीरिक पात्रता : तुम्हाला Military Bharti 2025 Training Program या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमची शारीरिक पात्रता पुढील प्रमाणे असणे आवश्यक आहे.

  • उंची :
    • कमीत कमी 157 सेमी (पुरुष)
    • कमीत कमी 152 सेमी (महिला)
  • छाती :
    • कमीत कमी 77 सेमी (दीर्घ श्वास घेतल्यानंतर 82 सेमी) केवळ पुरुषांकरिता.

Military Bharti Training 2025-26 Selection Process

निवड प्रक्रिया :

  • उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे करण्यात येणार आहे.
  • छाननी परीक्षेच्या वेळापत्रक बाबत माहिती अधिकृत वेबसाइट वरती प्रकाशित करण्यात येणार आहे.

Military Bharti 2025-26 Training Program Type

प्रशिक्षणाचे स्वरूप : उमेदवारांना प्रशिक्षण हे पुढील प्रमाणे देण्यात येणार आहे.

  • आर्मी भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण तसेच लेखी व शारीरिक प्रशिक्षणाचे अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
  • प्रशिक्षणाचा कालावधी हा सहा महिन्यांचा असणार आहे.
  • प्रशिक्षण अनिवासी स्वरूपाचे असणार आहे.
  • प्रशिक्षण ऑफलाईन स्वरूपाचे असणार आहे. त्यामुळे प्रशिक्षणासाठी तुम्हाला हजार राहावे लागणार आहे.

या अपडेट बघितल्या का? :

Mumbai Port Trust Bharti 2025: मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये नोकरीच्या संधी!

India Post GDS Bharti 2025: पोस्ट ऑफिस मध्ये तब्बल 21413 पदांची मेगा भरती | पात्रता 10वी पास

Military Bharti Training 2025-26 Document

आवश्यक कागदपत्रे : अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे पुढील आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

  • आधार कार्ड फोटो (पुढील व मागील बाजूसहित)
  • जातीचे प्रमाणपत्र
  • नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
  • दहावी गुणपत्रिका
  • अनाथ प्रमाणपत्र (लागू असल्यास)

How to Apply For Military Bharti Training 2025-26

अर्ज करावा :

  • सर्वात अगोदर तुम्हाला पुढे दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे. त्यानंतर Notice Board मधील “Application for Military Bharti 2025-26 Training” यावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करत असताना काही माहिती लाल रंगाच्या “*” या चिन्हाने दर्शवलेली असल्याने ती माहिती उमेदवारांना भरणे बंधनकारक आहे.
  • त्यानंतर तुम्हाला अर्ज सोबत आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे स्वाक्षंकित करून व्यवस्थित स्कॅन करून जोडायचे आहेत. आणि अर्ज सबमिट करायचा आहे.

Military Bharti 2025 Training Program Apply Online Last Date

अर्जसाठी शेवटची तारीख – 15 मार्च 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

Mahajyoti Military Bharti 2025-26 Training Apply Online

Military Bharti Training 2025
💻 सविस्तर माहिती साठी आपला टेलेग्राम चॅनलयेथे क्लिक करा
📄 अधिकृत परिपत्रकयेथे क्लिक करा
🖥️ ऑनलाइन अर्जApply Online
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
मित्रांनो तुमचे मित्र जर आर्मी भरतीचे तयारी करत असतील तर त्यांना लगेच Military Bharti Training 2025-26 ही माहिती शेअर करा. जेणेकरून त्यांना या योजनेचा लाभ होईल. आणि महत्वाच्या अपडेट तुम्हाला आपल्या या वेबसाइट द्वारे मिळत राहतील त्यासाठी आपल्या वेबसाइट ला भेट देत रहा.

महत्वाचे प्रश्न :

महाज्योती मिलिटरी भरती ट्रेनिंग प्रोग्राम 2025-26 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

15 मार्च 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

Military Bharti Training 2025-26 साठी कोण अर्ज करू शकणार आहे?

जे उमेदवार 10वी पास आहेत ते अर्ज करू शकणार आहेत.

Thank You!