Konkan Mahakosh Bharti 2025: कोंकण विभाग लेखा आणि कोषागार संचालनालय भरती! पगार 90 हजार रुपये पर्यंत!

Konkan Mahakosh Bharti 2025 Notification

maharashtra government

मित्रांनो Konkan Mahakosh Bharti 2025 द्वारे कोंकण विभागातील वित्त विभागांतर्गत लेखा आणि कोषागार  संचालनालयात एकूण 179 कनिष्ठ लेखापाल (गट-क) पदांसाठी भरती होत आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 मार्च 2025, रात्री 11:59 पर्यंत आहे.

पुढे तुम्हाला या भरतीची सर्व सविस्तर माहिती पाहायला मिळणार आहे. त्यामुळे अगोदर माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानानंतर अर्ज करा. जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

(अशाच महत्वाच्या अपडेट साठी आपला ग्रुप जॉइन करायला विसरू नका)

Konkan Mahakosh Recruitment 2025 In Marathi

भरतीचा विभाग – लेखा आणि कोषागार संचालनालय, महाराष्ट्र शासन वित्त विभाग मध्ये ही भरती होत आहे.

भरतीचा प्रकार – नियुक्त उमेदवाराला सरकारी नोकरी मिळणार आहे.

भरती श्रेणी – राज्य श्रेणी अंतर्गत ही भरती होत आहे.

नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना कोकण विभाग मधील (मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग) मध्ये नोकरी मिळणार आहे.

ही महत्वाची अपडेट बघितली का?

Bank Of Maharashtra Bharti 2025: बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 172 पदांची भरती.

Konkan Vibhag Mahakosh Vacancy 2025

पदांची माहिती – भरतीमध्ये कनिष्ठ लेखापाल (गट-क) पदासाठी हि भरती केली जाणार आहे.

पदाचे नावपदांची संख्या
कनिष्ठ लेखापाल (गट-क)179 पदे.

एकूण पदे – 179  पदे Konkan Mahakosh Bharti 2025 या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ही चांगली संधी आहे.

ही अपडेट बघितली का?

CDAC Recruitment 2025: प्रगत संगणक विकास केंद्रामध्ये मोठी भरती!

कोंकण विभाग लेखा व कोषागारे विभाग भरती 2025

आवश्यक शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.

शैक्षणिक पात्रतातपशील
शैक्षणिक अर्हताकोणत्याही शाखेतील पदवी (सांविधिक विद्यापीठ अथवा शासन मान्यताप्राप्त समतुल्य अर्हता)
टंकलेखन अर्हतामराठी – 30 श.प्र.मि. / इंग्रजी – 40 श.प्र.मि. (शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक)
संगणक अर्हताMS-CIT किंवा D.O.E.A.C.C. C.C.C./O-Level/A-Level/B-Level प्रमाणपत्र आवश्यक. नियुक्तीनंतर 2 वर्षांत पूर्ण करता येईल.

Mahakosh Vibhag Bharti Age Limit

वयोमर्यादा – वयोमर्यादा ही प्रवर्गानुसार वेगवेगळी आहे. त्यासाठी पुढचा टेबल पहा.

प्रवर्गकिमान वयोमर्यादाकमाल वयोमर्यादा
सामान्य प्रवर्ग19 वर्षे38 वर्षे
राखीव प्रवर्ग19 वर्षे43 वर्षे
दिव्यांग उमेदवार19 वर्षे45 वर्षे
माजी सैनिक19 वर्षेशासनाच्या नियमांनुसार सूट लागू

(Age Calculator – तुमचे वय चेक करण्यासाठी येथे क्लिक करा)

Mahakosh Vibhag Salary Per Month

पगार – नियुक्त उमेदवाराला सातवा वेतन आयोग नुसार ₹29,200 – ₹92,300 (पे लेव्हल 8-10) एवढे वेतन मिळणार आहे. त्यामुळे चांगल्या पगाराची नोकरी आहे.

Konkan Mahakosh Bharti 2025 Apply Online

अर्ज पद्धत – उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला महत्वाच्या लिंक पुढे दिल्या आहेत.

अर्ज सुरू होण्याची तारीख – 04 फेब्रुवारी 2025, सायं. 05:00 वाजल्यापासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

अर्ज शुल्क – अर्ज शुल्क हे प्रवर्गानुसार वेगवेगळे आहे.

खुला प्रवर्ग – ₹1000/-राखीव प्रवर्ग – ₹900/-

ही अपडेट बघितली का?

Income Tax Bharti 2025: आयकर विभाग मध्ये 35,400 रुपये पगाराची नोकरी.

Konkan Mahakosh Bharti 2025 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 मार्च 2025, रात्री 11:59 पर्यंत ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

निवड प्रक्रिया : निवड प्रक्रियेची माहिती पुढे दिली आहे.

Konkan Mahakosh Bharti 2025 Notification PDF

Konkan Mahakosh Bharti 2025

पुढे Konkan Mahakosh Bharti 2025 या भरती बद्दलच्या सर्व महत्वाच्या लिंक दिल्या आहेत जसे की, अधिकृत पीडीएफ जाहिरात, अधिकृत वेबसाइट इत्यादि. जेणेकरून तुम्ही महत्वाची माहिती पाहू शकता.

आपला टेलेग्राम चॅनलTelegram Channel
शॉर्ट नोटिस जाहिरातShort PDF Notification
आधिकृत वेबसाइटOfficial Website
ऑनलाइन अर्जApply Online
इतर अपडेटOther Important Update

Selection Process

maharashtra government

1. परीक्षेचे स्वरूप

  • ऑनलाईन परीक्षा (Computer Based Test – CBT) पद्धतीने घेतली जाईल.
  • प्रश्नपत्रिका बहुपर्यायी वस्तुनिष्ठ स्वरूपाची (MCQ) असेल.
  • परीक्षा एका सत्रामध्ये किंवा आवश्यकतेनुसार अनेक सत्रांमध्ये घेतली जाईल.

2. परीक्षेचा अभ्यासक्रम आणि गुणविभागणी

अ.क्र.विषयप्रश्नांचा दर्जाप्रश्नांची संख्याप्रतिप्रश्न गुणएकूण गुण
1मराठीउच्च माध्यमिक शालांत परीक्षा (12 वी)25250
2इंग्रजीउच्च माध्यमिक शालांत परीक्षा (12 वी)25250
3सामान्य ज्ञानपदवी दर्जा25250
4बौद्धिक चाचणीपदवी दर्जा25250
एकूण100200

3. परीक्षेचा कालावधी

  • एकूण परीक्षा वेळ: 2 तास (120 मिनिटे).
  • परीक्षा केंद्रावर वेळेपूर्वी उपस्थित राहणे आवश्यक आहे, कारण ओळख पडताळणी आणि सूचना प्रक्रियेसाठी अतिरिक्त वेळ लागेल.

4. गुण व किमान पात्रता

  • उमेदवाराने परीक्षेत किमान 45% गुण मिळवणे आवश्यक आहे.
  • सर्व सत्रांतील परीक्षांचा निकाल Normalization पद्धतीने जाहीर केला जाईल.

5. निवड यादी तयार करणे

  • परीक्षेतील गुणांच्या आधारे अंतिम निवड यादी तयार केली जाईल.
  • समान गुण प्राप्त झाल्यास, शासन निर्णय क्रमांक प्रानिमं 1222/प्र.क्र.54/का.13-अ, दिनांक 04/05/2022 नुसार प्रक्रिया केली जाईल.

6. मुलाखत प्रक्रिया नाही

मित्रांनो अशा पद्धतीने उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.

Konkan Vibhag Mahakosh Bharti 2025 ही माहिती इतर मित्रांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना या भरतीची माहिती होईल आणि त्यांना देखील नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि अशाच महत्वाच्या अपडेट साठी आपल्या अधिकृत वेबसाइट ला भेट देत जा.

भरतीबद्दल काही महत्वाचे प्रश्न :

कोंकण लेखा व कोषागारे विभाग भरती 2025 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?

Konkan Mahakosh Bharti 2025 या भरतीद्वारे 179 पदे भरण्यात येणार आहेत.

Konkan Mahakosh Recruitment 2025 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

06 मार्च 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.